मराठी टेक्नॉलॉजी जगत : वसंत पुरुषोत्तम काळे विचार

वपुंच्या विचारांवर आधारित नवीन, अत्याधुनिक आणि मोफत Android अप्लिकेशन Google Play वर उपलब्ध आहे. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्द्ल आम्ही अधिक जाणून घेतले असता त्यांनी अप्लिकेशनची ठळक वैशिष्ट्ये विषद केली,

यापैकी काही,
★ अत्याधुनिक आणि मुद्देसूद बांधणी
★ ५०० हून अधिक, दर्जेदार विचार
★ वपुंचे विचार आणि पुस्तके/कादंबरी यांचे योग्य आणि सोपे वर्गीकरण
★ प्रत्येक दिवशी नवीन विचार.. अन तोही आपण निश्चित केलेल्या वेळी!
★ डाऊनलोड करा तुमच्या आवडत्या विचारांचे छायाचित्र
★ वाचा वपुंच्या प्रत्येक पुस्तकाचा सारांश तसेच तुम्हाला हवे त्या पुस्तकामधील विचार वाचणे आता अगदी सोपे..
★ अँपमधील विचारांमध्ये दुरुस्ती तसेच नवीन विचार सुचवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा
★ तुमच्या आवडत्या विचारांसाठी स्वतंत्र विभाग
★ शेअर करा वपुंचे विचार WhatsApp, Facebook आणि इतर सोशल मिडिया वर…
★ अजून बरेच काही..

पुढे बोलताना ते म्हणाले,

अँपमध्ये असणारे प्रत्येक विचार हे व.पु. काळेंच्या लेखणीतुन आलेले आहेत. इंटरनेट, सोशल मिडिया, वर्तमानपत्रे तसेच प्रसंगी पुस्तके/कादंबरी समोर ठेवुन त्यातले निवडक आणि दर्जेदार विचार आम्ही संकलित केलेले आहे. त्यांच्या मूळ लिखाणात कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही यांची काळजी आम्ही घेत आहोत.

वपु अर्थात वसंत पुरुषोत्तम काळे यांच्या बद्दल थोडक्या शब्दात सांगायचे झाले तर,

img_vapu_kale_4

आपल्या कथाकथनाने हजारो रसिकांना हास्यअश्रूंच्या लाटेवर लीलया लोटून देणारे कथाकार वपु काळे. व.पु. काळे यांना ‘सिद्धहस्त’, ‘प्रतिभासंपन्न’ अशी बिरुदे लावली गेली नाहीत. पण त्यांच्या कथा-कादंबऱ्यांचा फॅन क्लब तुफान होता. गरजा भागल्या तरी माणसाला जो अपुरेपणा जाणवतो, मार्गदर्शकाची जी सतत गरज भासते आणि छोट्या छोट्या माणुसकीच्या प्रत्ययांनी त्याला जो आधार मिळतो, तो वपुंनी मांडला. आपल्या मनातल्या भावना त्यांनी नेमक्या टिपल्या म्हणून वाचक त्यांना धन्यवाद देतात. कॉलेज तरुणांच्या डायऱ्यांची पाने त्यांच्या पुस्तकांतील विचारांनी, विधानांनी भरभरून जातात. मध्यमवर्गीय वाचकाच्या हृदयांवर अधिराज्य गाजवणारा हा लेखक!

वपुंनी कादंबरी लिहिली, नाटक लिहिले, आत्मवृत्तपर व चरित्रात्मक लेखनही केले. पण त्यांचा खरा पिंड कथाकाराचा, याहीपेक्षा कथाकथनकाराचा आहे. साहित्याच्या या प्रकारात त्यांच्या शक्ती रसरसून येतात. त्यांच्या कथा अर्थवाही अन् भावप्रधान आहेत. पण त्यांचे कथाकथन मात्र एकदम रसरशीत आणि चैतन्यदायी आहे. त्यात त्यांचे शब्द काही खास ढंगाने, काही खास जिव्हाळ्याने, कधी आर्ततेने, तर कधी उन्मादाने नवे रूप धारण करतात. त्यातील माणसेही कोणी असामान्य नाहीत. अवतीभोवती असणार्‍या लहान माणसांचे मोठेपण आणि मोठ्या माणसांचे लहानपण हेच त्यांच्या लेखनात सापडते. त्यांच्या लेखनात सहजता आहे, सौंदर्य आहे, तोरा आहे…” वाचकप्रिय लेखक आणि एका वेगळ्याच संवेदनशील नजरेनं जग पाहणारा मनस्वी माणूस म्हणजे वपु.

वपु विचार‘ या अँपच्या माध्यमातून वपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला आपल्यासर्वांपर्यंत पोहोचवणाऱ्या “AmeyApps” टीमचे स्पंदनकडून अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीस खूप साऱ्या सदिच्छा!!

अप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा.
icon-store-google

Facebook: https://www.facebook.com/vapuvichar
Twitter: https://twitter.com/vapuvichar
Instagram: https://www.instagram.com/vapuvichar

धन्यवाद!
(शब्दांकन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

One thought on “मराठी टेक्नॉलॉजी जगत : वसंत पुरुषोत्तम काळे विचार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: