वास्तूशास्र – बेडरूम

बेडरूम वास्तुशास्त्रप्रमाणे असणे फारच हितावह ठरते. अयोग्य ठिकाणी बेडरूम असेल तर मानसिक सुखाला आणि समाधानाला ते पारखे ठरते.

पूर्वेकडचे बेडरूम:

पूर्वेकडे बेडरूम करू नये. ईशान्य आणि आग्न्येस किंवा मधोमध आल्याने त्रासदायक ठरते.

आग्नेयेकडे बेडरूम:

आग्नेयेकडे बेडरूम असल्याने शांत झोप येत नाही. पती- पत्नीमध्ये वादविवाद राहतात आणि नेमके झोपण्याच्या वेळेसच कटकटी होतात. सतत आर्थिक आणि मानसिक त्रास असतो.

दक्षिणेकडे बेडरूम:

दक्षिणेकडे बेडरूम चालते, पण झोपताना पाय दक्षिणेकडे करू नये. मृत व्यक्तीचे पाय दक्षिणेकडे ठेवण्याची प्रथा आहे.

पश्चिमेकडे बेडरूम:

अविवाहित मुली, मुले, पाहुणे यांना उत्तम परंतु नवीन विवाहित किंवा विवाहित जोडप्यास येथे झोपू देऊ नये. ते संततीस पीडाकारक ठरते.

वायव्याकडे बेडरूम: वायव्यकडे बेडरूम मुलांसाठी उत्तम ठरेल.

उत्तरेकडे बेडरूम:

ईशान्यकडे बेडरूम अजिबात नसावे. अनेक त्रासांनासामोरे जावे लागत. सर्व प्रकारचे खर्च अकारण वाढतात आणि असेलच तर शक्यतो नवीन जोडपे अगर कोणत्याच कोन्यात जोडप्याने तिथ झोपू नये.

(संकलन: स्पंदन टीम, साभार)

हेही वाचा,

वास्तूशास्र – लिविंग रूम (हॉल)

%d bloggers like this: