वास्तूशास्र – देवघर

ज्या भगवंताने आपणावर कृपा करून आपणास वस्तू मिळवून दिली, जीवनातील सर्व घटनांवर आणि कृत्यांवर ज्याची नजर आहे, जो आपणास संकटातून मुक्त करतो, अशा परमेश्वरास आपल्या घरात त्याचे स्वतःचे वेगळे घर असणे केव्हाही चांगलेच.

  • देवघर ईशान्य कोन्यात असावे.
  • फक्त दक्षिणाभिमुख देवघर ठेवू नका. ईशान्य कोपऱ्याच्या खोलीत, पश्चिमेस देवांचे मुख करून किंवा पूर्वेस देवांचे मुख करून ठेवावे.
  • ईशान्य खोलीच्या आग्नेय कोपऱ्यात देवाची समई किंवा दिवा लावावा.
  • जागेअभावी दोन किंवा तीन खोल्या असतील तर शक्यतो कोणत्याही खोलीच्या ईशान्येला देवघराची रचना करावी.
  • छोटे देवघर असल्यास ते जमिनीवर ठेवावे. लटकावून अडकवून ठेवू नये.
  • देवघर स्वच्छ सुंदर, पवित्र असावे. रोज सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती करावी.
  • रोज एक तेलाचा दिवा आणि तुपाचे निरंजन लावावे तर फारच उत्तम.
  • दर गुरुवारी धूप जाळावा.
  • जुने जीर्ण आणि खराब भंगलेले फोटो अगर मूर्ती किंवा एकापेक्षा जास्त मूर्ती विधीविहीत विसर्जित कराव्यात.
  • नैऋत्य कोपऱ्यात देवघर झाडण्यासाठीचा झाडू ठेवावा.
  • वायव्य कोपऱ्यात सहन चंदन ठेवावे. ईशान्य कोपऱ्यात पाण्याचे भांडे ठेवावे.
  • देवांचे मुख एकमेकांसमोर येतील असे ठेवू नये.
  • पुजाघरास लाकडाचा उंबरठा अवश्य करून घ्यावा.
  • देवघरात नुसतीच शंकराची पिंड नसावी त्याबरोबर नाग व नंदीही असावा.
  • देवघरात नैवेद्य दाखवावा पण देवघरात बसून जेऊ नये.
  • देवघरामध्ये कासावावरील श्री यंत्र (स्फटिकाचे) असेल तर लक्ष्मीस पुरवठा येतो.

(संकलन: स्पंदन टीम, साभार)

%d bloggers like this: