वार्षिक राशिभविष्य २०२३ : कुंभ

कुंभ राशींबद्दल सविस्तर विवेचन आम्ही ‘ओळख राशींची – कुंभ’ या लेखामध्ये केलेले आहे. जर आपण यावर भेट दिली नसल्यास अवश्य द्या. आज आपण येथे कुंभ राशींचे २०२३ चे संक्षिप्त राशिभविष्य पाहणार आहोत,

उत्कृष्ट बुद्धीमत्ता आणि अचाट स्मरणशक्ती असल्यामुळे या राशीची लोक हाती घेतलेल्या कामात यशस्वी होतात. यांचा जीवनविषयक दृष्टीकोन वेगळा असतो. मुळापर्यंत जाऊन अभ्यास करण्याची वृत्ती आणि मुडी स्वभाव यामुळे तुम्ही जरा जगावेगळे वाटता. शिवाय काळाच्या पुढे विचार करणारे असता.

तुमच्याच राशीमध्ये शनी महाराजांचे भ्रमण होणार आहे. कोणत्याही गोष्टीसाठी पराक्रमाची शर्थ कराल. अडचणी येतील. परंतु एकंदरीत यशाकडेच वाटचाल रहाणार आहे. वैवाहिक जीवनात पेल्यातील वादळे निर्माण होतील. तेथे थोडी तडजोड करावी लागेल. अंगात थोडा आळस शिरेल त्यामुळे कामे उरकण्यात थोडी दिरंगाई होईल. भावंडांशी मतभेद संभवतात. शेजाऱ्यांच्या गुप्त कारवायांमुळे त्रासून जाल. धार्मिक गोष्टी करण्यासाठी बराच पैसा खर्च कराल. राशीच्या द्वितीय व तृतीय स्थानातून होणारे गुरूचे भ्रमण सुख शांती देऊन जाणारे ठरेल. भाग्याची साथ एप्रिल २३ नंतर जास्त चांगली मिळेल. तब्येतीचे प्रॉब्लेम पूर्ण नाही पण बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येतील. आर्थिक स्थिती सुधारेल. संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्यांना हे वर्ष चांगले जाईल. मित्रमंडळींचे उत्तम सहकार्य मिळेल. मोठ्या भावंडांची मदत मिळेल. तुमच्या कामाचे लाभ तुम्हाला चांगले होतील. घरातील तंग वातावरण काही वेळा त्रासदायक होईल. मुलांच्या मताशी सहमत न झाल्यामुळे तणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. शिक्षणात थोडे अडथळे संभवतात. करियरमध्ये मानसिक अस्वस्थता जाणवेल. वडीलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी.

जानेवारी २०२३या महिन्यात तुमचा सल्ला महत्त्वाचा मानला जाईल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी आनंदी आणि उत्साही वातावरण लाभेल. तुमच्या आनंदात बरिष्ठही सहभागी झाल्यामुळे तुमचा आनंद अधिकच दुणावेल. नवीन वर्ष नवीन संधीचे दान तुमच्या पदरात टाकण्यासाठी येत आहे. घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. ज्या कार्याचा निश्चय कराल ती गोष्ट पार पडेपर्यंत तुम्हाला चैन पडणार नाही. उत्तम महत्त्वाकांक्षा ठेवून कामे पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन करणार आहात. त्यावेळी प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करणे आवश्यक ठरेल. घराकडे जातीने लक्ष द्याल.
फेब्रुवारी २०२३या राशीच्या तरुणांना नेत्रपल्लवीपेक्षा गंभीर चेहरा आवडत असल्यामुळे या महिन्यात अशा तरुणींच्या शोधात हे तरूण रहातील. व्यवहारात स्त्रियांच्या मध्यस्थीमुळे मनासारखी कामे होतील. आत्तापर्यंत केलेल्या कष्टाचे चीज होईल. स्थावर इस्टेटीचे प्रश्न मात्र रेंगाळण्याची शक्यता आहे. निद्रानाशाचे विकार उद्भवण्याची शक्यता आहे. याचे मुख्य कारण मानसिक अस्थिरता असू शकते. वाचनाची आवड जोपासाल आणि ज्ञानाचा आनंद घ्याल. गोड बोलून कामे करून घ्याल. आर्थिक स्थिती सुधारेल. एखादी फायदेशीर गुंतवणूक कराल. मुलांच्या करियरसंबंधी आर्थिक तरतूद करण्याकडे कल राहील.
मार्च २०२३नोकरीच्या ठिकाणी एखाद्या वादग्रस्त व्यक्तीला तुमच्यावर सोपवतील त्यांना सरळ करण्यात तुमचा हातखंडा रहाणार आहे. कुटुंबात तुमच्या नवीन विचारांचे स्वागत होईल, पैसा मिळवण्याचे वेगवेगळे पर्याय तुमच्यासमोर उपलब्ध होतील. त्याच्या निवडीचे स्वातंत्र्य तुम्हाला रहाणार आहे. जगावेगळ्या गोष्टी करण्याकडे कल राहील. घरातील मागच्या पिढीच्या लोकांशी मात्र मतभेद होण्याची शक्यता आहे. नियोजन आणि शिस्तीची फारकत तुमच्या वागण्यामध्ये झाल्यामुळे हे वाद निर्माण होतील. परंतु कोणत्याही परिस्थितीत मन:शांती बिघडू न देण्याचा विडाच तुम्ही उचलाल.
एप्रिल २०२३तुमच्या विरक्त स्वभावाचा घरातील मंडळींना खूप त्रास होईल. तुमच्या वागण्या बोलण्यात तफावत दिसल्यामुळे घरचे लोक तुम्हाला जाब विचारतील. फटकन एखादा निर्णय घेण्याचा अविचारही हातून घडू शकतो. तज्ञ व्यक्तींचे सल्ले मात्र उपयोगी पडतील. वरिष्ठ एखादे काम बिनादिक्कत तुमच्यावर सोपवतील. इथे तुमचा स्वाभिमान सुखावून जाईल. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रातील ज्ञानाचा तुम्हाला खूप उपयोग होईल. तुमच्या बोलण्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. तुमच्या नवीन कल्पनांचे स्वागत होईल. लेखकांच्या हातून उत्कृष्ट लिखाण होईल.
मे २०२३अत्यंत तरल व्यक्तीमत्त्वामुळे तुमच्याकडे कल्पनांचा खजिनाच असतो. या कल्पनेला सृजनशीलतेची जोड मिळाल्यास तुमच्यासारखे तुम्हीच अशी कौतुकाची थाप तुम्हाला या महिन्यात मिळेल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. प्रत्येक वेळी स्वतःच्या पद्धतीनेच काम करण्याच आग्रह न ठेवता दुसऱ्यांचा विचार करणे आवश्यक ठरेल. वैवाहिक सौख्य चांगले मिळेल. जोडीदाराचे सहकार्य चांगले मिळेल. कामाचा लाभ मिळेल. उत्तरार्धात बुद्धी आणि शारीरिक ताकद यांचे प्रमाण बिघडल्यामुळे कामाचा वेग कमी होईल.
जून २०२३संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्यांना उत्तम महिना. घरामध्ये तरुण वर्गाची ये जा वाढेल. घरामध्ये मतभेद होऊ शकतात. राजकारणात वावरत असलेल्या गुप्त शत्रूला तोंड द्यावे लागेल. रागाचा पारा जरा जास्तच चढेल. काही गोष्टी सहन कराल. परंतु जगाला तुमचे अस्तित्व दाखवून देणार आहात. घरामध्ये सौख्याच्या बाबतीत मिश्र फळे मिळतील. क्षुल्लक कारणावरून घरात बाद संभवतात. थोडी तडजोड करावी लागेल. परंतु स्वतःला आनंदी ठेवण्याचा खूप प्रयत्न कराल. अचानक खर्चाला तोंड द्यावे लागल्यामुळे थोडी धावपळ होईल. हाती घेतलेले काम पूर्ण कराल.
जुलै २०२३अती भावनाप्रधानतेमुळे मूडी किंवा एकलकोंडे होण्याची शक्यता आहे. नवीन गोष्टींचा वापर व्यवसाय नोकरीत करून त्यांचे प्रयोग करण्यासाठी पुढे सरसावाल. तुमच्या बौद्धीकतेचे मात्र कौतुक होईल. कोणत्याही किरकोळ गोष्टींचा बाऊ करू नये. प्रचंड चिकाटी ठेवाल आणि अभ्यासाव्यतिरिक्त गोष्टींमध्ये जास्त लक्ष दिले जाईल. याचा परिणाम अभ्यासावर होऊ शकतो. याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. आपले विचार लोकांपर्यंत पोचवणे महत्त्वाचे ठरेल. अती चिकित्सा काही वेळेस नडणार आहे. आर्थिक स्थिती समाधानकारक झाल्यामुळे निवांत रहाल. ज्यांना पाठीचे किंवा पायाचे दुखणे आहे त्यांनी औषधाबरोबर व्यायामही चालू करावा.
ऑगस्ट २०२३तुमचा स्वभाव शांत आणि प्रेमळ आहे पण थोडे हेकेखोर, हट्टी बनाल. स्वप्न अवश्य पहा परंतु त्याची वर्तमानकाळाशी सांगड घालणे महत्त्वाचे ठरेल. तुमची कल्पनाशक्ती वाखाणण्यासारखी राहील. राजकारणातील लाकांचे उत्तम नेतृत्व जनमानसाचा ठाव घेईल. छोटे मोठे प्रवासाचे योग वरचेवर येतील. व्यवसायात कामाची पद्धत आखीव आणि आधुनिक असल्यामुळे कामाची गती वाढेल. कलेच्या क्षेत्रात प्रगती होईल. महिला घरामध्ये टापटीप, सौंदर्याभिरूची जपण्याचा प्रयत्न करतील. डोळ्यांचे आरोग्य जपायला हवे. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कापडधंदा, बाद्यकलेशी निगडित व्यवसायांना चलती जाणवेल.
सप्टेंबर २०२३मनाविरुद्ध जर काही घडले तर सकारात्मक विचारामुळे उत्साह वाढेल. वैवाहिक जीवनात तर याचे महत्त्व फारच राहील. पित्तप्रकृतीच्या लोकांनी खाण्यापिण्यावर बंधन ठेवायला हवे. जेवणाच्या वेळाही सांभाळायला हव्या. कारखानदारी ज्यांची आहे त्यांना फायदेशीर व्यवहार करता येतील. लांबच्या प्रवासाचे योग येतील. मनःशांतीसाठी ध्यानमार्गाचा अवलंब केल्यास उत्तम. तुमच्या कामाचा लाभ तुम्हाला निश्चित मिळणार आहे. नावलौकिक आणि प्रसिद्धीही मिळेल. तुमची हुशारी वाखाणली जाईल. नावडत्या व्यक्तीविषयी अती आकस ठेवणे बरोबर नाही.
ऑक्टोबर २०२३या महिन्यात कल्पनाशक्तीच्या भराया उत्तम असल्यामुळे निर्मिती क्षमताही चांगली राहणार आहे. व्यावसायिक कर्ज मिळवण्याची प्रकरणे मार्गी लागतील. नोकरीमध्ये जबाबदारी वाढेल. पूर्वीच्या कर्तृत्वातून विविध प्रकारचे लाभ मिळतील. तुमची निर्णयक्षमता आणि कामाचा वेग वाढेल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल. तुमचा आत्मविश्वास वाढवण्याचा तो प्रयत्न करेल. मन आनंदी आणि उत्साही राहील. तुमची प्रतिष्ठा वाढेल. जे अवघड आहे ते जाणून घेण्याची तुमची क्षमता वरिष्ठांच्या नजरेतून सुटणार नाही. राजकीय क्षेत्रात असणारांना हा महिना घडामोडीचा जाईल.
नोव्हेंबर २०२३प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार केल्यास निराश होण्याची पाळी येणार नाही. धडाडी दाखवाल परंतु अशावेळी कोणताही अविचार होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. कष्टात कमतरता ठेवली नाही तर निश्चित तरून जाल. नोकरी व्यवसायात अधिकाराचे योग येतील. नवीन कामे मिळतील. सरकारी कामातील अडथळे दूर होतील. निश्चित कोणत्या दिशेने काम करावे याचे मार्गदर्शन करणारा एखादा गुरू तुम्हाला भेटेल. ज्ञान आणि धडाडीच्या जोरावर आकाशालाही गवसणी घालाल. घरात एखाद्या प्रसंगाला अचानक तोंड द्यावे लागेल.
डिसेंबर २०२३तटस्थ आणि स्थितप्रज्ञ वृत्तीमुळे. सर्वात वेगळे उठून दिसाल. अती तिथे माती या उक्तीनुसार शिस्तीलाही सवलत द्यावी लागणार आहे. नवनवीन गोष्टी करण्याकडे कल राहील. कलाकारांच्या हातून जगावेगळ्या कलाकृती निर्माण होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. वृत्ती आनंदी राहील. वर्तमानकाळात वावरत असलात तरी काम करता करता तुमच्या डोक्यात सतत भविष्यकाळ राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. त्यामुळे मानसिक समाधान मिळेल. व्यवसायात फायदा मिळेल. मागील वर्षांत बऱ्याच चांगल्या वाईट घटनांचा सामना धैर्याने केलात. नवीन वर्षही चांगल्या कामांसाठी खुणावत आहे. त्याचे आनंदाने स्वागत करा.

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: