शब्द…

🎊🎊🎊* शब्द *🎊🎊🎊

शब्दांनिच शिकवलय पडता पडता सावरायला,
शब्दांनिच शिकवलय रडता रडता हसायला,

शब्दांमुऴेच होतो एखाद्याचा घात आणि
शब्दांमुऴेच मिऴते एखाद्याची आयुष्यभर साथ,

शब्दांमुऴेच जुऴतात मनामनाच्या तारा आणि
शब्दांमुऴेच चढतो एखाद्याचा पारा,

शब्दच जपुन ठेवतात त्या गोड आठवणी ,
आणि शब्दांमुऴेच तरऴते कधितरी डोऴ्यात पाणी…

“म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल”

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.