सोपे घरगुती उपाय

सतत बदलत्या हवामान आणि प्रदूषणा मुळे थंडी भरून ताप येणे, सर्दी खोकला येतो, यासाठीच सोपे घरगुती उपाय पहा…..

१) पुदिना आणि आल्याचा काढा…
कुठल्याही प्रकारच्या तापावर उपयुक्त ठरतो. त्यामध्ये मेथी आणि मध घालूनही घेऊ शकता.

२) तुळशीच्या पानांचा काढा… तयार करून त्यात वेलची पूड आणि साखर घालून प्यायल्याने ताप लवकर उतरतो.

३) ओवा खा…
थंडी वाजून ताप येत असेल तर अर्धा चमचा ओवा खाल्लाने थंडीचा जोर कमी होऊन घाम येऊन ताप उतरतो.

४) गवती चहा…
जर सर्दी, ताप, थंडी आणि अंग दुखत असेल तर दालचिनीचा तुकडा, सुंठीचा तुकडा, लवंग, गवती चहा पाण्यात एकत्र करून दिवसातून दोन वेळा घेतल्याने ताप कमी होतो.

५) बेलफळाचं चूर्ण…
हें चूर्ण पाण्यात घालून घेतल्याने त्याचा ताप उतरण्यासाठी उपयोग होतो.

६) मनुके खाणे…
तापासाथी मनुके उपयुक्त असतात. २० ते २५ मनुके पाण्यात भिजत घालावेत. ते कुस्करून त्यात लिंबाचा रस घालावा. हे मिश्रण दिवसातून दोन वेळा घ्यावे.

७) फळे आणि भाज्या…
आहारात सफरचंद, खिचडी, टोमॅटो सूप, आलं, लसूण, काळी मिरी, शेवगा, कारली या पदार्थांचा समावेश करावा.

८) तुळस काढा…
कपभर उकळत्या पाण्यामध्ये मूठभर ताजी तुळशीची पानं टाका. हे मिश्रण ५ ते १० मिनिटे चांगले उकळू द्या. ते गाळून दिवसातून दोनदा प्या. मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांसाठी हा काढा फायदेशीर ठरतो. यामुळे ताप कमी होतो.

९) कोमट पाणी…
तापामध्ये भरपूर पाणी पिणं फायदेशीर ठरतं. यासोबत संत्र्यांचा रस घेतल्यानेही तापावर आराम मिळतो.

*©️®️सुनील इनामदार

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.