रामरक्षा – कलियुगाचे कवच कुंडले..

ज्योतिष शास्त्र हे वेदांचे उपांग आहे. आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी समाजाच्या कल्याणासाठी या शास्त्राची मांडणी केली व आपल्या स्वानुभावातून अनेक ठोकताळ्याने हे शास्त्र विकसित करून समृद्ध केले. वेदांचा उपविभाग असल्याने ज्योतिष हे शुद्ध तर्कशास्त्र व गणितावर आधारलेले साचेबद्ध असे शास्त्र आहे. उत्तम ज्योतिषी ईश्वर कृपेने अक्षरशः चमत्कार सदृश्य भाकीत करू शकतो.
ज्योतिष शास्त्रातील उत्तुंग अधिकार असणारे अनेक संत महात्मे होऊन गेलेले आहेत. ज्योतिष शास्त्र हे अनेक संतांचे लोक संग्रहाचे व लोककल्याणकारकाचे एक चांगले माध्यम आहे. जीवनामध्ये व्यावहारिक अडचणी किंवा संकटांमधून बाहेर पडल्यास लोक परमार्थ शांतपणे करू शकतात या उदात्त हेतूने संतांनी ज्योतिष शास्त्राचा अंगीकार करून सखोल अभ्यास करून जनकल्याणाचे भले केल्याचे आपणास दिसून येते.
स्तोत्र म्हणजे ईश्वराची स्तुती ईश्वराची केलेली प्रार्थना स्तोत्र म्हणजे एक आपले आत्म निवेदन होय. भगवंताच्या कृपा आशीर्वादासाठी हा जवळचा मार्ग आहेच असे नमूद करावेसे वाटते.
रामरक्षा हे स्तोत्र आहे तसेच ते कवच सुद्धा आहे. कवच म्हणजे एक चिलखत आहे रणांगणावर लढत असताना उपयुक्त असे संरक्षणाचे कवच एक साधन आहे. आपले जीवन म्हणजे काही रणांगण नाही मग रोजच्या दैनंदिन जीवनात या कवचाची उपयुक्तता कशाला पाहिजे? याची आवश्यकता का वाटावी? परंतु याची आवश्यकता आहे कारण आपले जीवन हे एक अज्ञात व प्रदीर्घ असा प्रवास आहे, या प्रवासामध्ये अनेक संकट येत असतात अशावेळी परमेश्वराच्या नावाचे कवच प्रधान केले असेल तर आपल्याला भीती राहत नाही अशी आपल्या मनामध्ये श्रद्धा असते विश्वास असते.
जन माणसावर प्रभाव असलेले एक महत्त्वाचे स्तोत्र म्हणजे रामरक्षा स्तोत्र. आजच्या काळात सुद्धा घराघरात श्रीराम सकाळ व संध्याकाळी देवासमोर बसून नियमित पाठ केला जातो. पिढ्यान पिढ्या हे स्तोत्र घराघरांमध्ये पोहोचलेले आहे गणपती अथर्वशीर्षानंतर हेच स्तोत्र विशेषतः करून जास्त प्रमाणात म्हटले जात असावे.
श्री रामरक्षा स्तोत्र हे श्री बुध कौशिक ऋषींनी लिहिलेले आहे. श्रीराम रक्षा स्तोत्र हे खरे तर कवच आहे. शरीराच्या प्रत्येक अंगाचे श्री प्रभू रामचंद्र आणि रक्षण करावे अशी प्रार्थना हे रामरक्षा स्तोत्राचे प्रमुख कार्य असले प्रभावी असे स्तोत्र आहे. मुख्य म्हणजे हे रामरक्षा स्तोत्र अनुष्ठुपछांदात रचलेले असल्याचे दिसून येते. सर्वच संतांची रचनाही एका विशिष्ट प्रयोजनासाठी झाली असल्याचे दिसून येते हा श्लोक एकादामामध्ये चांगल्या आवाजात त्या त्या छंदात म्हटले असता त्या एका विशिष्ट लय बद्धतेमुळे शरीरात जी कंपनी निर्माण होतात त्याचा शरीरावर व मनावर अतिशय सकारात्मक परिणाम झाल्याचा दिसून येतो.
श्री प्रभू रामचंद्र ही या स्तोत्राची प्रधान देवता असून श्री सीतामाई ही या स्तोत्राची शक्ती आहे तसेच श्री हनुमान हे या स्तोत्राचे कीलक असून श्रीरामचंद्राच्या कृपेसाठी या स्तोत्राचा पाठ करावयाचा असतो.
श्रीरामरक्षा स्तोत्र ||
श्रीगणेशायनमः ।
अस्यश्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य। बुधकौशिकऋषिः।
श्रीसीतारामचन्द्रोदेवता। अनुष्टुप्छन्दः। सीताशक्तिः।
श्रीमत्हनुमान्कीलकम्। श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः।।
।। अथ ध्यानम् ।।
ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं।
पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम्॥
वामाङ्कारूढ-सीता-मुखकमल-मिलल्लोचनं नीरदाभं।
नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डलं रामचन्द्रम्॥
।। इति ध्यानम् ।।
चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम्।
एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्॥१॥
ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम्।
जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितम्॥२॥
सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तं चरान्तकम्।
स्वलीलया जगत्त्रातुमाविर्भूतमजं विभुम्॥३॥
रामरक्षां पठेत्प्राज्ञ: पापघ्नीं सर्वकामदाम्।
शिरो मे राघव: पातु भालं दशरथात्मज:॥४॥
कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रिय: श्रुती।
घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सल:॥५॥
जिव्हां विद्यानिधि: पातु कण्ठं भरतवन्दित:।
स्कन्धौ दिव्यायुध: पातु भुजौ भग्नेशकार्मुक:॥६॥
करौ सीतापति: पातु हृदयं जामदग्न्यजित्।
मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रय:॥७॥
सुग्रीवेश: कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभु:।
ऊरू रघूत्तम: पातु रक्ष:कुलविनाशकृत्॥८॥
जानुनी सेतुकृत्पातु जङ्घे दशमुखान्तक:।
पादौ बिभीषणश्रीद: पातु रामोSखिलं वपु:॥९॥
एतां रामबलोपेतां रक्षां य: सुकृती पठेत्।
स चिरायु: सुखी पुत्री विजयी विनयी भवेत्॥१०॥
पाताल-भूतल-व्योम-चारिणश्छद्मचारिण:।
न द्र्ष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभि:॥११॥
रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्।
नरो न लिप्यते पापै: भुक्तिं मुक्तिं च विन्दति॥१२॥
जगज्जेत्रैकमन्त्रेण रामनाम्नाऽभिरक्षितम्।
य: कण्ठे धारयेत्तस्य करस्था: सर्वसिद्धय:॥१३॥
वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत्।
अव्याहताज्ञ: सर्वत्र लभते जयमङ्गलम्॥१४॥
आदिष्टवान् यथा स्वप्ने रामरक्षामिमां हर:।
तथा लिखितवान् प्रात: प्रबुद्धो बुधकौशिक:॥१५॥
आराम: कल्पवृक्षाणां विराम: सकलापदाम्।
अभिरामस्त्रिलोकानां राम: श्रीमान् स न: प्रभु:॥१६॥
तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ।
पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ॥१७॥
फलमूलशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ।
पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ॥१८॥
शरण्यौ सर्वसत्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम्।
रक्ष:कुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघूत्तमौ॥१९॥
आत्तसज्जधनुषा विषुस्पृशा वक्षया शुगनिषङ्ग सङिगनौ।
रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रत: पथि सदैव गच्छताम्॥२०॥
संनद्ध: कवची खड्गी चापबाणधरो युवा।
गच्छन् मनोरथोSस्माकं राम: पातु सलक्ष्मण:॥२१॥
रामो दाशरथि: शूरो लक्ष्मणानुचरो बली।
काकुत्स्थ: पुरुष: पूर्ण: कौसल्येयो रघूत्तम:॥२२॥
वेदान्तवेद्यो यज्ञेश: पुराणपुरुषोत्तम:।
जानकीवल्लभ: श्रीमानप्रमेयपराक्रम:॥२३॥
इत्येतानि जपेन्नित्यं मद्भक्त: श्रद्धयान्वित:।
अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशय:॥२४॥
रामं दूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससम्।
स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नर:॥२५॥
रामं लक्ष्मण-पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरं ।
काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम्।
राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथ-तनयं श्यामलं शान्तमूर्तिं ।
वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम्॥२६॥
रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे।
रघुनाथाय नाथाय सीताया: पतये नम:॥२७॥
श्रीराम राम रघुनन्दन राम राम।
श्रीराम राम भरताग्रज राम राम।
श्रीराम राम रणकर्कश राम राम।
श्रीराम राम शरणं भव राम राम॥२८॥
श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि।
श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि।
श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि।
श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये॥२९॥
माता रामो मत्पिता रामचन्द्र:।
स्वामी रामो मत्सखा रामचन्द्र:।
सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्।
नान्यं जाने नैव जाने न जाने॥३०॥
दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे च जनकात्मजा।
पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम्॥३१॥
लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम्।
कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये॥३२॥
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये॥३३॥
कूजन्तं राम-रामेति मधुरं मधुराक्षरम्।
आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्॥३४॥
आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदाम्।
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्॥३५॥
भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदाम्।
तर्जनं यमदूतानां रामरामेति गर्जनम्॥३६॥
रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे।
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नम:।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम्।
रामे चित्तलय: सदा भवतु मे भो राम मामुद्धर॥३७॥
राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे।
सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने॥३८॥
इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णम्॥
॥ श्री सीतारामचन्द्रार्पणमस्तु॥
|| श्रीराम जय राम जय जय राम ||
(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)
