गोविंदा

गोविंदाने फक्त स्वर्ग सिनेमा केला असता आणि दुसरा कोणताही सिनेमा केला नसता, तरी त्याच्या अभिनयाचं
‘ मेटल ‘ मी मानलं असतं.

विनोद, गंभीर,भावनिक, बदला, ॲक्शन अश्या विविध अभिनय कौशल्याचं प्रात्यक्षिक गोविंदाने स्वर्ग सिनेमात दाखवलं होतं.

समोर माधवी, राजेश खन्ना, जुही चावला, परेश रावल, सतीश कौशिक अशी मातब्बर मंडळी. पण गोविंदा त्यांच्यामध्येही चमकून गेला.

” हां, वो छोटी मालकीन के गाडी से आया हूं “

” मैं अब मेरे हाथ खोलता हूं “

” मैं समझ गया साहब जी, मैं समझ गया “

” जा नही उठाता मैं तुम्हारा माल “

” मुझे आदमी की औकात का अंदाजा है धनराज, मैं जानता हूं कौन कहां आकर टुट सकता है “

स्वर्ग मधील ही सगळी संवादफेक गोविंदा चा वरचा क्लास दाखवते.

स्वर्ग नंतर गोविंदाने माईलस्टोन सिनेमे केले.

बॉक्स ऑफिस वर रेकॉर्ड पैसे कमावणारा आँखे,
कादर खान बरोबर जुगलबंदी चा दुल्हे राजा,
कॉमेडी आणि इमोशनल राईड चा राजा बाबू,
एकट्याच्या खांद्यावर कॅरी केलेला हिरो नंबर वन,
गोंधळ आणि फसवणुकीची कॉमेडी असलेला कूली नंबर वन,

सगळेच भन्नाट !

दिवाना मस्ताना मधील बुन्नू, हसीना मान जाएगी मधील चाचा फक्त गोविंदाच करू शकतो.

क्योंकी मैं झूठ नही बोलता मध्ये तर त्याने कमालच केली आहे. अंबीशीअस व्यक्ती यश मिळवण्यासाठी काय करू शकते आणि ते करताना त्यामध्ये किती सफाईदार खोटू बोलू शकते, हे गोविंदाने अप्रतिम पद्धतीने साकारलं आहे. त्याचे सिनेमातील काही संवाद ज्या स्पीड ने बोलले गेले आहेत, त्याला तोड नाही.

राजा बाबू मधला एक सीन बघताना रडू आवरत नाही. जिथे गोविंदा ला कळतं तो अनाथ आहे. तिथे तर, सीन ची फक्त पार्श्वभूमीच तयार करायला एक से एक महारथी आहेत.

बिना, अरुणा इराणी, कादर खान, अरुण बक्षी सीन ची सुरुवात करतात. आणि शेवटी गोविंदा म्हणतो, ” माॅं, तूने मुझे कितना प्यार दिया रे, कितना प्यार दिया “. त्याच्या त्या आवाजातील आर्तता डोळ्यात पाणी आणते. थीएटर ॲक्टर नसून सुध्दा अशी ॲक्टिंग करणं विशेष आहे.

गोविंदाची राजकीय आणि आध्यात्मिक वाटचाल त्याला लखलाभ.

पण मला वाटतं, आजच्या किंवा तेव्हाच्या पिढीतील बहुतांश लोकांना गोविंदा ची किंमत कळाली पण व्हॅल्यू कळाली नाही.

त्या वेळच्या निर्मात्यांना गोविंदा ची किंमत कळाली म्हणून त्याच्याकडे खूप सिनेमे आले. हीट झाले, फ्लॉप झाले. वडीलांच्या सिनेमा धंद्यातील नुकसानामधून वर आल्यामुळे, त्याने सिनेमा साईन करताना फक्त पैसा बघितला. तो खूप बिझी झाला.

आणि म्हणून, नृत्य कौशल्य वगैरे एक्स्ट्रा टॅलेंट सोडलं तर गोविंदा खूप बिझी होता, तो एकावेळी 3 – 4 शिफ्ट करायचा… एवढीच ती काय भारतीय सिनेमा वर गोविंदा ची छाप.

आपण त्याची हीच व्हॅल्यू केली !

पण मुळातच अवघड असणाऱ्या कॉमेडी अभिनय प्रकाराला गोविंदाने सहज न्याय दिला. जे करण्यास आजकालच्या अभिनेत्यांना ओढून ताणून सगळं करावं लागतं. हे सहज विसरलं जातं.

राहिला विषय अवॉर्ड बीवार्ड, रेकगनेशन चा, तर गोविंदाला ते मिळालं नाही. कारण त्याने PR केलं नाही. किंवा डझनभर रोमँटिक हीट गाणी असलेले, आऊट अँड आऊट सतत हिरोईन च्या मागे लागण्याचे सिनेमे त्याला मिळाले नाहीत.

आणि ह्यापुढे त्याला त्याच्या कामाचं काय रेकगनेशन मिळेल असं वाटत नाही.

काहीही म्हणा, पण गोविंदा खास होता.

One thought on “गोविंदा

  1. mza fev hero govinda ch ah..ata mi tishi t ahe..pn jevha psun movie bgitle tevhapsun govinda salman mze hero hote ajhi ahet..tasech marathi mdhe lakshya ani ashok mama..he hote hindi ani marathi sinedrushti bgynyat anad hota..jevha jevha hyanche movies bgitle ayusha bharbharun jaglo anandi zalo manapsun…stress kuthlya kuthe palun gela hyani shikvla kontya hi situation mdhe stable kse rahaycha swatala cool kas thevaycha ani situation shi don hat kse karyche he amche stress buster hote..

Leave a Reply to pratibha r karande Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.