माणसांतील ऋतूबदल
आजवर मी बरेच लेख लिहिले आणि त्या सर्व लेखांना आपण सर्वांनी भरभरून दाद दिलीत त्याबद्दल सर्व प्रथम आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!
आज मी जरा वेगळ्या धाटणीच्या विषयाला हात घालणार आहे, अर्थात जरा वेगळ्या विषयावर प्रकाश टाकणार आहे! हा लेख मी कोणाला लक्ष करुन वा कोणाला केंद्रस्थानी ठेवून लिहिणार नाही तर मला अर्थात आपणा सर्वांनाच रोजच्या आयुष्यात असे सर्रास अनुभव येत असतील असा अंदाज बांधून त्यावर लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे जे कोणी हा लेख वाचतील त्यांनी फारसं मनावर न घेता केवळ हसण्यावारी ते सोडुन द्यावं अशी मी आशा करते!
लोकांना रडवणं खूप सोपं आहे परंतु हसविण्यासाठी मात्र कस लागतो!
निसर्गाने आपल्याला तीन ऋतू घालून दिलेले आहेत ते म्हणजे उन्हाळा, पावसाळा व हिवाळा! परंतु माणसांमध्ये किती ऋतू असावेत ह्याचं उत्तर आपल्याला कुठल्याही शब्दकोशात सापडणार नाही!
हे वाचायला थोडं वेगळं वाटलं ना! तर त्यावरच आधारित माझा आजचा लेख आहे!
“व्यक्ती तितक्या प्रकृती” हि उक्ती आपण नेहमीच पाहतो,वाचतो, ऐकतो तसेच आपल्या नित्य जीवनात अनुभवतो देखील! परंतु किती प्रकृती असाव्यात याचं काही ठराविक, ठोस असं अनुमान नाही!
आपल्या सर्वांच्याच आयुष्यात असंख्य प्रकारची माणसं येत- जात असतात तसेच चांगले – वाईट अनुभव देऊन जात असतात त्यावर लिहिण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे!
काही माणसं हि आपल्या नात्यात असोत वा नसोत पण कधीतरी भेटतात, आपल्याशी इकडच्या – तिकडच्या गूजगोष्टी करतात, त्यामध्ये बराचसा वेळ निघून जातो! त्याचा मनाला वेगळाच आनंद मिळतो! याला अनुसरून मला पुढील गीताचे बोल सुचतात ते म्हणजे
” जाने कितने दिनों के बाद, गली में आज चांद निकला!”🤔
काही माणसं हि आपल्याशी केवळ टाइमपास म्हणून ही बोलणारी असतात, म्हणजे त्यांना वेळ मारुन न्यायची असते म्हणून मग तासनतास गप्पा ठोकत बसतात असंही आपल्या अनुभवास येतं! याला अनुसरून मला पुढील गीताचे बोल सुचतात ते म्हणजे
” तेरे पास आके, मेरा वक्त गुजर जाता है!” 😊
“मीठे बोल मगर दिल में कूछ और” या उक्तीप्रमाणे काही माणसं हि बोलायला इतकी गोड असतात कि ज्याचं नाव ते … म्हणजे जिभेवरुन मध 🍯 टपकनंच फक्त बाकी राहतं नि मग आपल्याला असं वाटून जातं की, अरेरे हि व्यक्ती आपल्याला आधी का बरं नाही भेटली? परंतु कधी कधी अति गोड माणसांच्या संपर्कात राहणं घातकी ठरु शकतं! कारण जे ओठांवर तेच मनात असेल असं नाही त्यामुळे अशा माणसांपासून जरा सांभाळून रहावं लागतं! याला अनुसरून मला पुढील गीताचे बोल सुचतात ते म्हणजे
” बोल तेरे मीठे – मीठे, बात तेरी साची लागे!” 😋
त्याउलट काही माणसं हि बोलायला एकदम बिनधास्त,बेधडक, हजरजबाबी असतात, म्हणजे जे ओठांवर तेच अंत:करणात! खोटेपणा त्यांना अजिबात खपत नाही असा काहींचा स्वभाव असतो! परंतु अशी माणसं बोलायला जरी सडेतोड असली तरी त्यांच्या मनात प्रेम असतं! प्रेमळ माणसं हि इंजेक्शन सारखी असतात, ते तुम्हाला कधी वेदना देतीलही पण त्यांचा उद्देश तुमची काळजी घेणं हाच असतो परंतु लोकांना तोंडावर गोड बोलणारीच माणसं जास्त प्रिय असतात याचा नेहमीच प्रत्यय येतो! याला अनुसरून मला पुढील गीताचे बोल सुचतात ते म्हणजे
“हमको दुश्मन की निगाहों से ना देखा कीजे, प्यार हि प्यार है हम हमपे भरोसा किजे!”🫠
तसेच काही माणसांच्या बाबतीत अंदाज बांधणं खूप कठीण असतं म्हणजे अशा माणसांचं फार मूडी काम असतं जसं की, मनात असेल तरच बोलणार अन्यथा नाही म्हणजे मग कधी कधी असा प्रश्न उपस्थित होतो की, अरे आपला या व्यक्तीशी नक्की परिचय आहे ना?
याला अनुसरून मला पुढील गीताचे बोल सुचतात ते म्हणजे
“आज के दौर में ए दोस्त ये मंजर क्यूं हैं?” 🥺
“नव्याचे नऊ दिवस” या उक्तीप्रमाणे काही माणसं हि ओळख झाल्यावर सुरुवातीच्या काळात आपल्याला वेळ देतात, आपल्या भावनांची कदर करणारे असतात परंतु कालांतराने काय बिनसतं माहित नाही परंतु मग बोलायचं म्हटलं तर वेगवेगळ्या सबबी दिल्या जातात असंही अनुभवास येतं! याला अनुसरून मला पुढील गीताचे बोल सुचतात ते म्हणजे
“गैरों पे करम, अपनों पे सितम … ये जुल्म ना कर, रहने दे अभी थोडासा भरम!”😔
काही माणसं हि केवळ गरज भागण्यापुरती आपल्याशी बोलतात, एकदा का गरज संपली की, तू कोण? आणि मी कोण? ” गरज सरो न वैद्य मरो!” अशी त्यांची भूमिका असते! याला अनुसरून मला पुढील गीताचे बोल सुचतात ते म्हणजे
“मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है?” 🤨
“कामापुरता मामा” अशी पण काहींची भूमिका असते म्हणजे काम करुन घ्यायचं असेल तर तेवढ्यापुरतंच गोड बोलणार! याला अनुसरून मला पुढील गीताचे बोल सुचतात ते म्हणजे
“इस मतलब कि दुनिया में, कौन किसी का होता है?” 😏
“तुमने पुकारा और हम चले आये” 🤩 असे पण काही जण असतात म्हणजे आवाज दिला की साद घालणारे, मग कधीही गरज लागू देत ते आपल्या मदतीला धावून येणारच!
“जान ना पहचान, तू मेरा मेहमान” या उक्तीप्रमाणे काही माणसं हि फारशी ओळख नसतांनाही अगदी आपलं समजून भेटतात, आपलेपणाने बोलतात असंही अनुभवास येतं! याला अनुसरून मला पुढील गीताचे बोल सुचतात ते म्हणजे
” एक फरिश्ता मिल गया है, रुप में इन्सान के!” 🤗
काही माणसं आपल्याला अशीही भेटतात कि जे फक्त आपण मेसेज केला वा फोन केला तरच बोलणार आणि भरभरून बोलणार परंतु स्वत:हून कधीच संपर्क साधणार नाही! याला अनुसरून मला पुढील गीताचे बोल सुचतात ते म्हणजे
“अजीब दास्तां हैं ये, कहां शुरु कहां खतम, ये मंजिले हैं कौनसी, ना वो समज सके ना हम!” 🫡
काही माणसं आपल्याला अशी पण भेटतात, ज्यांना भेटलं की जन्म- जन्मांतरीचं आपलं काहीतरी नातं आहे असंही वाटून जातं! मग त्यांना कितीही भेटलं, त्यांच्याशी बोललं तरी कमीच असतं! याला अनुसरून मला पुढील गीताचे बोल सुचतात ते म्हणजे
“तेरा मुझसे है पहले का नाता कोई, यूं हि नहीं दिल लुभाता कोई!” 😍
सगळ्यात शेवटी पण महत्वाच्या विषयाला हात घालते तो ना आपण कुठल्या पाठ्यपुस्तकात शिकतो ना कुठल्या अभ्यासक्रमात शिकतो पण तरीही सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय तो म्हणजे “राजकारण”! आपण बघतो हे घरी – दारी, सर्वत्र सर्रास खेळलं जातं! त्यात लोकांना एक वेगळाच आनंद मिळतो! खरंतर राजकारणात नातं जरुर असावं पण कुठल्याही नात्याचं राजकारण मात्र करु नये परंतु ब-याच अंशी असंच चित्र पहायला मिळतं! याला अनुसरून मला पुढील गीताचे बोल सुचतात ते म्हणजे
“हम ना समझे थे बात इतनीसी, ख्वाब शिशे के दुनिया पत्थर की!” 🤔
आपल्या आयुष्यात येणारी माणसं ही झाडांच्या अवयवासारखीच असतात! काही फांदीसारखी जास्त जोर दिला की तुटणारी… काही पानासारखी अर्ध्यावर साथ सोडणारी… काही काट्यासारखी सोबत असूनही टोचत राहणारी… आणि काही मुळांसारखी न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी…
याला अनुसरून मला पुढील गीताचे बोल सुचतात ते म्हणजे
“मैंने देखे हैं सभी रंग दुनिया के, हां ये दुनिया, ये दुनिया बडी रंगिली!” 🙏👍🌈🤩
@ लता गरगटे – चौधरी!
