हंसवाहिनी सरस्वती

हंसवाहिनी सरस्वतीच्या पदकमली रमते
माते मन पावन होते ।।धृ.।।

मूर्ती साजिरी नयन मनोहर
धवल वस्त्र किती शोभे सुंदर
चंद्रहि लाजे उदास अंत भारावून जाते ।।१।।

वीणा हाती मंजूळ वादन
श्वेत कमल हे मंगल आसन
राजहंस तव राजस वाहन, घे वंदन माते ।।२।।

(संकलन: टीम स्पंदन, साभार: लेखक/कवी)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.